Shankarachi Aarti | शंकराची आरती – लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

In Hinduism Aarti is performed after completion of puja. Lord Ganesh is worshipped first in any ritual or puja. So Ganesh Aarti is performed first, after that Kuladaivata (कुलदैवत) Aarti and finally the Aarti of the god whose puja is being performed is sung. In Marathi, Shiv Aarti is known as ‘Shankarachi Aarti‘. Lavthavti Vikrala is a devotional aarti sung in the glory of Lord Shiva.

हिंदू संस्कृती मध्ये गणपतीस आद्यपूजेचा मान आहे. कोणत्याही देवाच्या पूजे आधी गणपतीचे पूजन केले जाते. त्यामुळे आरती करताना सुद्धा गणपतीची आरती सर्वप्रथम केली जाते. त्यानंतर कुलदेवतेची आणि त्यापाठोपाठ देवीची व इष्टदेवतेची आरती म्हटली जाते. पूजेच्या वेळी किमान तीन आरत्या म्हटल्या पाहिजे अशी पद्धत आहे.

‘लवथवती विक्राळा’ ही भगवान शंकराची आरती आहे. भगवान शंकराची पूजा झाल्यावर आरती म्हटली पाहिजे कारण ह्या आरती मध्ये भगवान शंकराची स्तुति केली आहे.

Shankarachi Aarti

Shri Shankarachi Aarti Lyrics in Marathi

|| श्री शंकराची आरती ||

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।
वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।।
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।१।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।

कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा।
आर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।।२।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।

देवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें।
त्यामाजी जें अवचित हळाहळ उठिलें।
तें त्वां असुरपषं प्राशन केलें।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ।।३।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी ।।४।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।


Shankarachi Aarti Image

To read offline you can download the Shankarachi Aarti Image format.

Shankarachi Aarti Image

Shiv Tandav Stotram किंवा Shiv Chalisa पाठ केल्या नंतर शंकराची आरती म्हटल्यास उत्तम लाभ मिळतील.


Shankarachi Aarti PDF Download

So in this article we saw the Shiv Aarti Marathi Lyrics. Read this Aarti daily to get amazing results. If you read it daily you will feel happy and motivated throughout the day. You can read it daily using PDF file. Just click on the download button to download the Shiv Aarti Marathi Lyrics PDF.

भगवान शंकराची आरती PDF file डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लिक करा.

Leave a Comment