Shiv Stuti in Marathi | शिव स्तुति – कैलासराणा शिव चंद्रमौळी [PDF]

According to Hinduism this universe is created by the Gods. There is trinity of Hindu Gods – Lord Brahma, Lord Vishnu, and Lord Shiva. Lord Brahma is known as Creator, Lord Vishnu is known as the Preserver, and Lord Shiva is known as the destroyer in the trinity. The stuti is sung to please the God. There is a famous Shiv Stuti in Marathi composed to praise the Lord Shiva.

हिंदू धर्मात आणि हिंदू देवता मधे भगवान शंकराचे अतिशय महत्वाचे स्थान आहे. भगवान शंकर आपल्या भक्त जनांची प्रार्थना अतिशय लवकर ऐकतात आणि पूर्ण करतात म्हणून त्यांना भोलेनाथ असे ही म्हटले जाते. शिव स्तुति ही भगवान शंकराची स्तुति करणारे गीत आहे.

श्री शिव स्तुति मराठी मध्ये एकूण ३१ श्लोक आहेत. प्रत्येक श्लोकामध्ये भगवान शंकराच्या रूपाचे, शक्तिचे, योगमुद्रेचे इत्यादिचे वर्णन केले आहे. शिव स्तुतितिल प्रत्येक श्लोकाचा शेवट हा “तुजवीण शंभो मज कोण तारी” ह्या ओळीने झालेला आहे.

Shiv Stuti in Marathi

Shiv Stuti Lyrics in Marathi / शिव स्तुति

|| श्री शिव स्तुति ||

कैलासराणा शिव चंद्रमौळी । फणींद्र माथा मुकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदु:खहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥

रवींदु दावानल पूर्ण भाळी । स्वतेज नेत्री तिमिरांध जाळी ।

ब्रम्हांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २ ॥

जटा विभूती उटी चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्र्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३ ॥

वैराग्ययोगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी ।
उमाविलासा त्रिपुरांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४ ॥

उदार मेरू पति शैलजेचा । श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधी तो गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५ ॥

ब्रम्हादि वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरि सोमकांत ।
गंगा शिरी दोष महा विदारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ६ ॥

कर्पूरगौरी गिऱिजा विराजे । हळाहळे कंठ निळाचि साजे ।
दारिद्र्यदु:खें स्मरणे निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ७ ॥

स्मशानक्रीडा करिता सुखावे । तो देवचुडामणि कोण आहे ।
उदासमुर्ती जटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ८ ॥

भूतादिनाथ अरि अंतकाचा । तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ९ ॥

नंदी हराचा हरि नंदिकेश । श्रीविश्र्वनाथ म्हणती सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १० ॥

भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदे करि काम भग्न ।
तो रुद्र विश्र्वंभर दक्ष मारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ११ ॥

इच्छा हराची जग हे विशाळ । पाळी सुची तो करि ब्रम्हगोळ ।
उमापती भैरव विघ्नहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १२ ॥

भागीरथीतीर सदा पवित्र । जेथें असे तारक ब्रम्हामंत्र ।
विश्र्वेश विश्र्वंभर त्रिनेत्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १३ ॥

प्रयाग वेणी सकळा हराच्या । पादारविंदी वहाती हरीच्या ।
मंदाकिनी मंगल मोक्षधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १४ ॥

कीर्ती हराची स्तुती बोलवेना । कैवल्यदाता मनुजा कळेना ।
एकाग्रनाथ विष अंगिकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १५ ॥

सर्वांतरी व्यापक जो नियंता । तो प्राणलिंगाजवळी महंता ।
अंकी उमा ते गिरिरूपधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १६ ॥

सदा तपस्वी असे कामधेनू । सदा सतेज शशिकोटिभानू ।
गौरीपती जो सदा भस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १७ ॥

कर्पूरगौरी स्मरल्या विसावा । चिंता हरी जो भजका सदैवा ।
अंती स्वहीत सूचना विचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १८ ॥

विरामकाळी विकळ शरीर । उदास चित्ती न धरीच धीर ।
चिंतामणी चिंतने चित्तहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १९ ॥

सुखवसानें सकळे सुखाची । दु:खवसाने टळती जगाची ।
देहावसानी धरणी थरारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २० ॥

अनुहत शब्द गगनीं न माय । त्याचेनि नादे भाव शून्य होय ।
कथा निजांगे करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१ ॥

शांति स्वलीला वदनी विलासे । ब्रम्हांडगोळी असुनी न दिसे ।
भिल्ली भवानी शिव ब्रम्हचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २२ ॥

पितांबरे मंडित नाभि ज्याची । शोभा जडीत वरि किंकिणीचि ।
श्रीदेवदत्त दुरितांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २३ ॥

जिवा-शिवाची जडली समाधी । विटला प्रपंची तुटली उपाधी ।
शुद्धस्वरे गर्जति वेद चारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २४ ॥

निधानकुंभ भरला अभंग । पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग ।
गंभीर धीर सुर चक्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २५ ॥

मंदार बिल्वे बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरी भैरव विश्र्व तारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २६ ॥

जाई जुई चंपक पुष्पजाती । शोभे गळा मालतिमाळ हाती ।
प्रतापसूर्यशरचापधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २७ ॥

अलक्ष्यमुद्रा श्रवणी प्रकाशे । संपूर्ण शोभा वदनी विकासे ।
नेई सुपंथे भवपैलतीरी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २८ ॥

नागेशनामा सकळा झिव्हाळा । मना जपे रें शिमंत्रमाळा ।
पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २९ ॥

एकांति ये रे गुरुराज स्वामी । चैतन्यरुपी शिव सौख्य नामी ।
शिणलो दयाळा बहुसाल भारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३० ॥

शास्त्राभ्यास नको श्रुती पढू नको तीर्थासि जाऊ नको ।
योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रे तपे ती नको ।
काळाचे भय मानसी धरू नको दृष्टास शंकू नको ।
ज्याचीया स्मरणे पतीत तरती तो शंभु सोडू नको ॥ ३१ ॥

Watch the below video to listen the Shiv Stuti in the voice of singer Anuradha Paudwal.


You can also download the Shiv Stuti Hindi Lyrics PDF.


Download Shiv Stuti Marathi Lyrics PDF

Read this Shiv Stuti Marathi daily and express the gratitude towards god for this amazing life. As this Shiv Stuti is long, it’s not possible to memorize it immediately. So to make it convenient for your daily reading we are providing you with the PDF file of this. Download the Shiv Stuti Marathi Lyrics PDF and read it daily.

Leave a Comment